English ची स्वारी… येत आहे तुमच्या दारी…

ट्रेनिंग चे फायदे
- ११७+ इ- लर्निंग विडिओ
- ९०+ इंग्लिश वाचन आणि आकलन टेक्निक्स
- ६३+ प्रॅक्टिस शीट्स PDF स्वरूपात
- संरचना आधारित शिक्षण
- वर्षभर WhatsApp द्वारे फ्री सपोर्ट
- “Teachers Heroes of Maharashtra ” चा भाग होण्याची संधी
- ट्रेनिंग अगदी तुमच्या जवळपासच्या भागात
- इंग्लिश शिका आणि शिकवा आपल्या मातृभाषेत
- ऍक्टिव्हिटी आधारित ट्रेनिंग
- “Word Power Championship ” चा भाग होण्याची संधी
- शालेय व्याकरणाव्यतिरिक्त अधिक माहिती
- इंग्लिश वरील आत्मविश्वास वाढविण्याची संधी
- विद्यार्थ्यांमध्ये इंग्लिश विषयाची आवड निर्माण
- विद्यार्थ्यांच्या शालेय उपस्थितीत वाढ
- टेक्निक्स समजण्यास आणि लक्षात ठेवण्यास अतिशय सोप्या
लीप फॉर वर्ड विषयी
लीप फॉर वर्ड (LeapForWord) ही मुंबईस्थित संस्था 2009 पासून फक्त एकाच उद्देशासाठी काम करत आहे ते म्हणजे, प्रादेशिक भाषिक शाळांमधील मुलांना सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकविणे. ज्या मुलांसाठी काम करायचे आहे त्या मुलांमध्ये राहून, वातावरणात असलेला इंग्लिशचा अभाव जाणून घेऊन, 12 वर्षांच्या संशोधनाच्या बळावर, एक अनोखा आणि प्रभावी अभ्यासक्रम बनवण्यात आला.
Read more….
प्रादेशिक भाषेची पार्श्वभूमी असलेल्या समुदायात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण आणि अशा शिक्षणातून उपलब्ध होणाऱ्या रोजगारांच्या संध्यांपासून वंचित ठेवणारा सगळयात मोठा अडथळा “इंग्लिश भाषेतील कमतरता” पुर्णतः दूर करण्याचा इरादा बाळगणारी “लीप फॉर वर्ड” ही एक NGO (स्वयंसेवी संस्था) आहे. ज्या शिक्षकांवर इंग्लिश शिकविण्याची जबाबदारी आहे परंतु अस्खलित इंग्लिश बोलता येत नसल्याने इच्छा असून सुद्धा मनासारखे शिकवू न शकणाऱ्या शिक्षकांना ध्यानात ठेऊन आम्ही तयार केलेला तोडगा आहे “द इंग्लिश लिटरसी प्रोग्रॅम”. हा प्रोग्रॅम आम्ही विकसित केलेल्या ‘ट्रान्सलेशन अल्गोरिथम’ (भाषांतर करण्याचे नियम) वर आधारित आहे. ह्या प्रोग्रॅमच्या वापराने,इतर कोणत्याही विषयाप्रमाणे, इंग्लिशसुद्धा आपल्या मातृभाषेतून शिकविले जाऊ शकते.तसेच,अगदी कमी वेळात विद्यार्थ्यांना इंग्लिश वाचन,आकलन व अचूक वाक्यरचना कशी करायची हे शिकविले जाऊ शकते. 2016-17 सत्रात फक्त एकाच जिल्ह्यात कार्यरत असलेली आमची संस्था फक्त 3 वर्षात महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात पोहोचली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात मात्र, हे कार्य महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात पोहोचविण्याच्या हेतूने “लीप फॉर वर्ड” टीम राज्य दौऱ्यावर निघत आहे. पुढील वर्षात 200 ट्रेनिंग्स द्वारे 20000+ शिक्षकांबरोबर English शिकविण्याच्या Techniques share करण्याचे महत्वाकांक्षी काम आम्ही हाती घेतले आहे. तुम्हीही इंग्लिशवर मात करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी शिक्षक असाल तर आम्हाला तुम्हाला भेटायचे आहे, तुमच्या तालुक्यात तेही लवकरच!!! अधिक माहिती जाणून घेऊन ह्या ट्रेनिंग साठी रजिस्टर करायचे असल्यास कृपया खाली दिलेला फॉर्म नक्की भरावा.
0
YEARS OF FIELD EXPERIENCE
0
TEACHERS
0
STUDENTS IMPACTED
0
DISTRICTS COVERED
0
Registered Teachers
ट्रेनिंगचे रेजिस्ट्रेशन करण्यासाठी:
Step 1 :खालील फॉर्म मध्ये योग्य ती माहिती भरून SUBMIT ह्या बटनवर क्लिक करावे.
Step 2 : Pay For Booking Seat ह्या बटनवर क्लिक करून 500 रूपयांचे शुल्क भरावे.
Step 3 : PAYMENT यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर तुमच्या नावाने ट्रेनिंगसाठी सीट बुक होईल.
Step 4 : ट्रेनिंग सीट बुक झाल्यावर योग्य माहिती तुम्हाला तुमच्या E – Mail ID वर पाठविण्यात येईल.
नोट : कोणत्याही प्रकारची शंका असल्यास Contact Us बटनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
FAQ’s
१. ट्रेनिंग मध्ये काय केले जाईल?
मुलांमध्ये खाली दिलेल्या क्षमता घडविण्याच्या टेक्निक्स प्रात्यक्षिक ह्या ट्रेनिंग्स मध्ये मिळेल
१. Reading: कोणताही शब्द कसा वाचावा?
२. Comprehension: कोणत्याही वाक्याचा अर्थ कसा समजावा?
३. Sentence Structuring: मनातले मराठी वाक्य इंग्लिश मध्ये कसे बनवावे?
१०:०० ते ५:३०. ह्या मध्ये अर्ध्या तासाचा लंच ब्रेक असेल तर १५ मिनिटांचे दोन शॉर्ट ब्रेक्स असतील.
ह्या ट्रेनिंग साठी ५०० रुपयांची देणगी रुपी प्रवेशिका आहे. “लीप फॉर वर्ड” हि संस्था प्रत्येक इच्छुक शिक्षकाला वर्षभर व्हॉट्सअँप द्वारे फ्री सपोर्ट देते. ह्या सपोर्ट द्वारे आम्ही १२ वर्षांत तयार केलेले सगळे कॉन्टेन्ट विडिओ, Quizzes, tests, PDF द्वारे शिक्षकांना देतो. तुम्ही जमा केलेली हि वर्गणी २०१९-२०२० सत्रात अधिक शिक्षकांना सपोर्ट देण्यात वापरण्यात येईल.
हो. जर पावती मिळाली नाही तर पैसे भरू नका
५. ह्या ट्रेनिंग मध्ये काही स्टडी मटेरियल मिळणार का?
नाही. परंतु सहभागी होणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला आमची PPT मेल / व्हॉट्सअँप केली जाईल तसेच त्या शिक्षकाचे “Teacher Support System” मध्ये आपोआप नोंदणी होईल जेणेकरून वर्षभर हळू हळू करून सर्व कॉन्टेन्ट मिळेल.
६. फी ट्रेनिंग च्या ठिकाणी देऊ शकतो का?
हो परंतु, सीट्स full झाल्यास आम्ही तुम्हाला सहभागी करून घेऊ शकणार नाही. तुमचे येणे नक्की असल्यास तुम्ही ONLINE पैसे भरून त्वरित नोंदणी करावी.
७. नोंदणी करून न आल्यास पैसे परत मिळतील का?
तुम्ही भरलेले पैसे ही देणगी प्रवेशिका आहे. ती परत करणे आम्हाला शक्य होणार नाही, तरीही इच्छेशिवाय आम्हाला ते ठेवायचे नाहीत. म्हणून तुमच्या पत्त्यावर आम्ही ४ कलर पुस्तके (Reading + Grammar Concept books) पोस्टाने पाठवू. तेवढेच नाही तर Teacher Support System साठी देखील आपोआप नोंदणी होईल.
८. जेवणाची, चहा पाण्याची सोया असेल का?
ट्रेनिंग टीम मुंबईहुन येत असल्याने आम्हाला तुमच्या तालुक्यातील बऱ्याच गोष्टी माहीत नसतील. म्हणून जेवणाची सोय होऊ शकणार नाही, परंतु पाणी, दोन वेळेचा चहा आणि Packaged फूड्स (biscuits, cakes etc..) ची व्यवस्था करण्याचा प्रयत्न राहील.
९. आम्ही काय घेऊन येणे अपेक्षित आहे?
नोट्स घेण्यासाठी वही व पेन / पेन्सिल
आम्ही असाच हॉल घेण्याचा प्रयत्न करू ज्यात खुर्च्यांची सोय असेल. तुमच्या माहितीत असा हॉल असल्यास कृपया सुचवावे
११. ट्रेनिंग मध्ये फक्त शालेय शिक्षकच येऊ शकतो का?
नाही. तुम्ही जर मराठी भाषिक मुलांना / मराठी शाळेत शिकणाऱ्या मुलांना (ज्यांच्या आजू बाजूच्या वातावरणात इंग्लिश नाही) इंग्लिश शिकवतात तर तुम्हाला ह्या ट्रेनिंग चा फायदा होईल. मग तुम्ही कोणीही असू शकतात,
– शालेय शिक्षक (शासकीय, अनुदानित, खाजगी)
– शिकवणी वर्ग चालवणारे शिक्षक
– पालक
– स्वयंसेवी शिक्षक
– संस्थेत (NGO) काम करणारे शिक्षक
sangli jilhyat kontya talukyat training niyojit ahe ?
प्रविण सर, या शैक्षणिक वर्षातील इंग्लिशची स्वारी काही ठराविक जिल्ह्यांत म्हणजेच मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, सातारा, येथे होणार आहे. तरी या व्यतिरिक्त हि उरलेल्या जिल्ह्यात आम्हाला यायला नक्कीच आवडेल परंतु, कमीत कमी ८००-१००० शिक्षक तयार असतील तर इतर ठिकाणी हि स्वारी घेऊन नक्की येऊ.
Please mention date of training
Yogesh Sir, Dates Are Already Mentioned.
मराठवाडा जिल्ह्यात येणार का english स्वारी
चरावंडे सर / मॅडम , या शैक्षणिक वर्षातील इंग्लिशची स्वारी काही ठराविक जिल्ह्यांत म्हणजेच मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, सातारा, येथे होणार आहे. तरी या व्यतिरिक्त हि उरलेल्या जिल्ह्यात आम्हाला यायला नक्कीच आवडेल परंतु, कमीत कमी ८००-१००० शिक्षक तयार असतील तर इतर ठिकाणी हि स्वारी घेऊन नक्की येऊ.
टेॢनिग तालुका स्तरावर होईल का?
नमस्कार गजानन सर, ट्रेनिंग प्रत्येक जिह्यातील काही निवडक तालुक्यांमध्ये होणार आहे. अंतिम ट्रेनिंग ची जागा तुम्हाला तुम्ही दिलेल्या नंबर वर फोन अथवा मेसेज करून सांगण्यात येईल.